Tuesday, May 27, 2014

पैशांच्या आणि शब्दांच्या पलीकडले …. -ओंकार करंदीकर

पैशांच्या आणि शब्दांच्या पलीकडले ….

             माणूस जगण्यासाठी पैसे मिळवतो हे जरी खरं असलं तरी पैसे हे माणसाचं सर्वस्व कधीच नसतं. काही गोष्टी अशा असतात ना की ज्यांचं मोल पैशात मांडता येत नाही आणि शब्दात सांगता येत नाही.आपण त्या फक्त जगत असतो .अगदी निस्पृहपणे ! त्यात कोणताही स्वार्थ नसतो, महत्वाकांक्षा नसते.फक्त आणि फक्त निखळ आनंद असतो ,जो सगळ्यात महत्वाचा असतो.काही वेळा दुखं ही असेल ,अश्रू ही असतील पण तेही खरे असतील.केवळ दिखाव्याकरता नव्हे.
              एक उदाहरण द्यायचं झालं तर सचिन,सेहवाग आणि असे अनेक महान खेळाडू आहेत ज्यांची फलंदाजी बघताना असं वाटतं की 'यार इसीलिए तो हम जीते है ना !!!' डोळ्यांचं पारणं फेडणारे अफलातून फटके.किती सांगू ते तरी Cuts,drives ,pulls असे मनात कोरले जातात. मी असा एक एक फटका कितीही वेळा पाहून खुश होऊ शकतो ,express speed ने गोलंदाजी करणाऱ्या ब्रेट ली,शोऐब अख्तर यांना एका bullet drive ने गप्पं करणारा तेंडूलकर शब्दात न सांगता येणारा आनंद देऊन जातो. हीच गोष्ट Football  आणि tennis ची Ronaldo,Rooney यांचे mesmerizing goals, Federer चा artistic slice backhand ,Nadal चा powerfull forehand …. हे सगळं असं असतं खूप क्षणिक पण त्याची आठवण आयुष्यभर आपली सोबत करते. 
सगळ्यात विस्मयकारक गोष्टं अशी की हे सगळं कुठेतरी दूर देशात सुरु असतं. तसं बघायला गेलं तर आपला काहीही संबंध नसतो पण तरीही आपला favourite player किवा team हरली कि आपल्याला त्यांच्या पेक्षा जास्त वाईट वाटतं. इंग्लंड मधल्या एका Manchester United ने मला काय दिलं याची किंमत मी पैशात करूच शकणार नाही… इंडिया क्रिकेट चा सामना जिंकल्यावर जितका आनंद मला होतो न तितकाच आनंद मला Manchester United जिंकली कि होतो. विराट कोहली ची century झाली कि जितकं सुख मिळतं तितकचं सुख रोनाल्डो च्या गोल्स मुळे मिळतं. 
                तीच गोष्टं संगीत,साहित्य-काव्य,सिनेमा-सिरिअल्स  यांच्याविषयी पण, आपल्या अभिजात शास्त्रीय आणि नाट्य संगीता पासून निर्माण होणारं स्वर-विश्वं,दाणेदार ताना,लयकारी हे  जितकं मनाचा ठाव घेतं ,तितकाचं प्रभाव किशोर कुमार,मोहम्मद रफी,आशा भोसले या लोकांच्या अजरामर जुन्या हिंदी गाण्यांनीही पडतो, काही नवी हिंदी गाणी सुद्धा खूप सुंदर असतात,आपली मराठी नवीन गाणीही तितकीच भावतात… यासोबत American Rock Band 'Linkin Park' हे तर माझं आवडतं आहे. 
                तर कमाल अशी कि 'भैरवी' ऐकताना किंवा 'वसंतराव देशपांडे' यांची 'तेजोनिधी लोहगोल','या भवनातील गीत पुराणे' ऐकताना किंवा किशोरदांचं 'पल पल दिल के पास तुम रेहती हो','जब कोई बात बिघड  जाये'  ऎकताना किंवा Linkin park चं 'In The End','In Pieces','Pushing Me Away' ऎकताना मनांत नक्की काय होतं आणि का इतका आनंद मिळतो किंवा का इतकं depress व्हायला होतं हे सांगता येत नाही पण फक्त जाणीव होते ती हि की हे एक वैश्विक सत्य आहे. जगभर माणसाच्या संस्कृतीमध्ये आणि जगण्यामध्ये फरक असला तरी मुलभूत भावना सारख्याच असतात. 
                कुसुमाग्रज,मंगेश पाडगावकर,आरती प्रभू,विंदा  या जुन्या बुजुर्ग कवींच्या प्रेम कविता मला जितकं निखळ सुख देतात ना तितकंच सुखं  मला आजच्या संदीप खरे,सौमित्र,गुरु ठाकूर,स्पृहा जोशी   यांच्या हळुवार कविता सुद्धा देतात. किंबहुना कोणत्याही कवीची-कवयित्री ची चांगली कविता मला भावते … मग एकदा आवडली कि मी समाधान होई पर्यंत ती कविता कितीही वेळा वाचू शकतो,प्रत्येक वेळी नवा नवा अर्थ लागत जातो… हाच तो निखळ आनंद.   
                  एखादा अप्रतिम सिनेमा ,त्यातला एखादा प्रसंग,गाणं अभिनेता-अभिनेत्रींनी त्यांच्या लाजबाब अभिनयाने आणि संवाद-फेकीने कधी रडवणं कधी हसवणं हे सुद्धा तसाच निखळ . 
                पुस्तक-कादंबरी-आत्मचरित्र यांच्या बाबतीत पण तेच … 'श्रीमान योगी,छावा,महानायक'… यांसारखी भारावून टाकणारी ऐतिहासिक पुस्तकं असो किंवा चेतन भगत ची तरुण मुला-मुलीना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली अप्रतिम नोवेल्स असो … किंवा Andre Aagassi ,Wayne Rooney यांसारख्या legendery players ची आत्मचरित्र असो … हि सगळी पुस्तकं …आपल्याला नुसताच आनंद नाही देत तर जगण्यासाठी प्रेरणा देतात ,काहीतरी शिकवत असतात आपल्याला … आणि पुन्हा एकदा हे सगळं पैशांच्या आणि शब्दांच्या तागडीत मोजता न येण्या सारखच आहे. 
                हे सगळं होतं मनोरंजनाबाबत पण त्याहून महत्वाचं काहीतरी असतच आणि ते म्हणजे प्रेम-मैत्री. जिवलग मित्र-मैत्रीणीन सोबत घालवलेले क्षण हा तर आयुष्यभर पुरणारा ठेवा असतो,त्याची आठवण नंतर कधीतरी दूर एकटे असताना आपल्याला होते आणि अश्रू-हास्य यांचं अनोखं मिश्रण चेहऱ्यावर उमटतं . हे सुद्धा अवर्णनीय आणि केवळ स्वतःपुरतं असणारं निखळ सुख . 
                काही अनुभव तर या सगळ्याच्या पलीकडे नेणारे असत्तात… ते जगताना, मनात कोणताही विचार नसतो असा म्हणा चुकीचं ठरेल पण नक्की कोणता विचार असतो हे सांगणंही  कठीण होईल.'मनाली' सारख्या भूर-भूर पडणारया बर्फाने खच्चून भरलेल्या गोठवून टाकणाऱ्या थंडीच्या अवस्थेत २ उंच डोंगरांच्या मध्ये असलेल्या भयाण दरीत १ min साठी का होईना पण स्वतःला कोणतीही पर्वा न करताना Zip-Lining साठी झोकून देतो आणि मग हवेत असताना ,,दुसऱ्या टोकाला पोहोचेपर्यंत मनात आधी भीती मग आश्चर्य आणि सगळ्यात शेवटी समाधान हे सगळा सुरु असता आणि नकळत आपण ओरडत असतो… त्या ओरडण्यात काहीतरी महान पराक्रम केल्याचा आवेश असतो… ते १ min कितीही वेळा repeat करायला मी तयार आहे … पण असे अनुभव पुन्हा पुन्हा फारसे वाट्याला येत नाहीत .जेव्हा येतात तेव्हा कसलीही पर्वा न करता पूर्णपणे स्वतःला त्यांच्या हवाली करून निश्चिंत राहायचं आणि सुख अनुभवायचं … हेच खरं जगणं असतं असं मला वाटतं … मग त्यासाठी थोडे पैसे खर्च झाले म्हणून कुठे बिघडलं … दुसरीकडे कुठंतरी करू कि त्याग आणि काटकसर… पण इथे नाही . 
                   त्यामुळे शेवटी मला नेहमी असं वाटतं कि या शब्दातीत भावनांचा खेळ सुरु आहे तो पर्यंत आयुष्य व्यवस्थित आहे .तोपर्यंत माणूस हा माणूस आहे , नाहीतर माणूस एखाद्या यंत्रमानवासारखा झाला असता…. या अश्या शब्दात न सांगता येणाऱ्या आणि पैशांनी मोजताना न येणाऱ्या गोष्टीच जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देतात … समाजाच्या दृष्टीने त्याचं मोल फार नसेलही कदाचित  पण आपल्या स्वतःसाठी ते सगळ्यात महत्वाचं असतं.माझ्या मते माणूस प्रत्येक क्षणाला बदलत असतो,प्रत्येक घडणाऱ्या घटने सोबत तो काही ना काही नक्की शिकतो.जुन्या संकटांच्या अनुभवामुळे नवी संकट झेलायला तयार असतो आणि जुन्या सुखाच्या अनुभवामुळे ते पुन्हा उपभोगायला उत्सुक असतो . म्हणून असं म्हणावसं वाटतं की  'Am not the same person I was an hour ago, let alone the years gone before   '.  
                   असो हे आपलं माझा वैयक्तिक मत झालं,प्रत्येकाने आपल्या जगण्याची व्याख्या अशीच करावी असा माझा आग्रह अजिबात नाही…   फक्त एक जुनं गाणं आठवलं… 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया ,हर फिक्र को धुएमें उडाता चला गया ' 
                                                                        -ओंकार करंदीकर 

2 comments:

  1. Thats why they we say we live in a global village.. आपल्या भाषेच्या, देशाच्या, संस्कृतीच्या सीमा ओलांडून, विविधरंगी, विविधढंगी अनुभव घेउन समृद्ध होत we are developing our new culture.. That's nice...!! :)

    ReplyDelete