Thursday, July 31, 2014

'ट्रेन' विषयीच्या गमती-जमती. -ओंकार करंदीकर

'ट्रेन' विषयीच्या गमती-जमती.

      लोकल ट्रेन्स म्हणजे मुंबईकरांचा एकदम जिव्हाळ्याचा विषय(ईलाज नाही !!)खरतर Driving Force च म्हणा ना! लोकल्स थांबल्या की जणू जीवन ठप्प होतं. त्यासोबत अनेक गमतीशीर अनुभव येतात ,खुमासदार किस्से ऐकायला मिळतात.
       मी लहान होतो न तेव्हा मला वाटायचं की स्लो लोकल म्हणजे तिचा स्पीड कमी आणि फास्ट लोकल म्हणजे तिचा स्पीड जास्त. नंतर सत्य कळलं तेव्हा गम्मत आणि राग असं mixed feeling आलं ( गम्मत सत्यामुळे आणि राग स्वत:च्या मुर्खपणामुळे ) म्हणे सगळीकडे थांबते म्हणून स्लो लोकल आणि काही ठराविक महत्वाच्या स्थानकांवर थांबते म्हणून ती फास्ट!!(ही काय फालतुगिरी!).
       अजून एक गोष्ट जी सगळे मान्य करतील … लोकल ट्रेन मध्ये कितीही लोक मावू शकतात,म्हणजे साधारण डोंबिवली ला आपण गाडीत चढलो तर गाडी जवळ जवळ भरलेलीच असते आणि मग आपण विचार करतो की आता काही फार माणसं अजून मावणार नाहीत… पण छे!! मला इथे शाळेत शिकलेला भौतिकशास्त्राचा नियम आठवतो की समजा एका ग्लास मध्ये पाणी काठोकाठ भरलं आणि मग एक छोटा बर्फाचा खडा अलगद त्यावर सोडला तरी पाणी बाहेर पडत नाही लगेच कारण बर्फ वितळून ते  पाण्याच्या दोन रेणूंमध्ये असलेल्या जागेत (Intermolecular Space) ते जातं .
     मग गाडी cst असेल नाहीतर कर्जत त्यात लोक भरतच जातात (अर्थात काही लोकं वेगवेळ्या स्टेशन्स वर उतरतात!)म्हणजे एखादी पाणीपुरी खाताना ती काठोकाठ भरावी आणि शेवटी तोंडात घालताना पाणी हनुवटीवर सांडाव न तश्यातला प्रकार झाला( म्हणजे काही लोक लटकत लटकत जातात त्यापैकी काही दुर्दैवाने किंवा मस्तीमुळे पडतात ).
     पावसाळ्यात तर बघायलाच नको! मुळात आधी ट्रेन नेहमीच वेळेवर येतात असं नाही (आपण उशिरा आलो कि आधी येतात :P ) त्यात हा ऋतू म्हणजे त्यांचा हक्काचा…कुठे पाणीच तुंबून राहील तर कुठे Overhead wire पडेल… एक न दोन !! अर्थात college बुडवायला उत्तम निमित्त (exam नसेल तर … नाहीतर गोची होते ).
     हा नन्ना चा पाढा जरी मी वाचत असलो तरी ट्रेन मध्ये Enjoyment पण कमी नसते बरं का!
सगळ्यात जास्त करमणुकीचा विषय म्हणजे ट्रेन मध्ये होणारी बाचाबाची(पु.लं च्या भाषेत  'बा'चा 'बा'ची) आणि शिवीगाळ. आपल्याला बसायला जर जागा मिळाली असेल किंवा व्यवस्थित उभं राहता आलं तर मग असल्या भांडणाचा मनोसक्त आस्वाद घेता येतो!(अर्थात आपलं लक्ष नाही असं दाखवून :P). 
     अजून एक मजेदार गोष्ट आहे जी माझ्या एका मित्राकडून शिकलोय! ती म्हणजे लोकांचे चेहरे आणि एकंदर देहबोली न्याहाळणं. खूप हसू येतं (ते ज्याला हसतोय त्याच्या पासून लपवण्यात पण खूप मोठं Skill असतं)एखादा माणूस पेंगत असतो … पेंगताना बाजूला झोकांड्या देतो ,त्यामुळे बाजूचा माणूस त्रस्त असतो.. तोही मग खोट्या खोट्या झोपेत मुसंड्या मारून अधिच्याचे वार परतवतो! एखादा उगाच विश्वाची चिंता असावी तसा डोक्याला हात लावून बसतो,एखादा  दारात असलेल्या मधल्या बार शी प्रणय क्रीडा करत पाय वाकवून उभा असतो( अर्थात ह्या सगळ्या पोझ मी सुद्धा देत असेन  नकळत! आणी लोक हसत देखील असतील)हे सगळं का तर कंटाळवाणा प्रवास लवकर संम्हणून.
   कधी कधी काय होतं फार धावत धावत ट्रेन पकडावी लागली तर चुकून किवा मुद्दामून अपंगांच्या डब्ब्यात चढावं लागतं. मग काय तिथेही बाचाबाची किंवा हल्ली तर TC च्या लक्षात आलं तर… असो अजून एक वादग्रस्त गोष्ट म्हणजे पुरुष्यांच्या डब्यात स्त्रिया चढतात ते.म्हणजे स्त्रियांच्या डब्यात गर्दी असताना पुरुष्यांच्या  डब्यात चढणं ठीक आहे पण उगीच च्या उगीच पुरुष्यांच्या डब्यात चढणं मला पटत नाही(इथेही पुरुष्यांच्या जागा ढापायच्या!!!). जोक सपाट पण ते स्त्रियांच्याही दृष्टीने फार बरं नाही असं माझं स्पष्ट मत आहे…ते का ते सुजाण  लोकांना(पुरुष आणस्त्रियादोघही!!) कळेलच.        
      माणसांच्या स्वभावांचा अभ्यास करायचा असेल ना तर ट्रेन सारखं दुसरं ठिकाण नाही. नुसतं गप्प बसून किंवा मधेच एखादी फुसकुली सोडून चर्चा ऐकयचं काम करायचं!फार मौज आहे त्यात. तुम्हाला एक उदाहरण देतो.समजा एक ट्रेन दोन स्टेशन्स च्या मध्ये खूप वेळ बंद पडून राहिली ना जे साधारण संवाद सुरु होतात ना ते असे असतात…. एक जण म्हणतो "च्यायला ह्या driver (motorman) ला पण आत्ताच ट्रेन बंद करायची होती का?" ,दुसरा एक म्हणतो " हो ना! ही नेहमीची कटकट आहे " …. तिसरा मात्र असतो मोटरमन चा कैवारी ; तो म्हणतो " सिग्नल नाही तर बिचारा driver काय करणार?"  मग हे पहिले दोघे विरुद्ध तिसरा असं मस्त debate आपल्याला    ऐकायला मिळतं आणि आपण त्यात उत्स्फूर्त सहभाग सुद्धा घेऊ शकतो! काही लोक ह्या वादाचा आस्वाद घेत घेत एकीकडे वर्तमानपत्र वाचायचं ढोंग करतात. ह्या सगळ्याशी काहीच देणं घेणं नसलेले कानाला headphones लावून शांतपणे 'संगीत' आराधना करतात काही वेळा सोबत एखादी 'संगीता' ही असते :p ….हे सगळं सुरु असताना खरा problem काय हे कोणालाच माहित नसतं आणि मग बाजूने दुसरी एक ट्रेन उलट्या दिशेने जाताना दिसते आणि लक्षात येतं की हीच खरी गुन्हेगार !पण लगेच आपलीही ट्रेन सुरु होते आणि त्या आनंदात त्या दुसरया ट्रेन ला थोड्याफार शिव्या देऊन आपण विसरून  जातो!आणि मगाचचा वाद विरून जाऊन सगळे आपापल्या विश्वात रममाण होतात. सध्या  मात्र कोणी काही चुकीचं बोललं कि लगेच 'नया है वह' चे नारे दुमदुमतात.  
        जे लोक रोज ठरलेल्या ट्रेन ने प्रवास करतात ना म्हणजे office वाले आणि विद्यार्थी ,त्यांचे डबे आणि जागा ठरलेल्या असतात,त्यामुळे अपोआप मित्र बनतात,मग entertainment की कोई कमी मेहसूस नही होती. पत्ते,आता smartphone मुळे chain reaction सारखे addictive games ,engineering ला असल्यामुळे submissions च्या काळात शेपटीला आग लागल्याप्रमाणे बाकी राहिलेल्या प्रिय assignments सुद्धा आम्ही ट्रेनमध्ये करतो! Vivas आणि main exam च्या वेळी ट्रेन मध्ये मित्रांसोबत केलेला अभ्यास ही सगळ्यात मजेदार बाब असते.
         अजून एक गमतीदार आणी माझी आवडती गोष्ट म्हणणे ट्रेनमध्ये लावलेल्या अगणित आणी बरयाचदा अगम्य असलेल्या जाहिरातींच वाचन! भाग्य उजळवणार्या तथाकथित अंगठ्यांपासून ते job vacancies आणि ३-BHK flat पासून अध्यात्मापर्यंत वाट्टेल त्या प्रकारच्या जाहिराती असतात. एक तास आपला सहज जातो.
        पण ह्या गोष्टीचा कधी कधी मी दुसरया बाजूने सुद्धा विचार करतो आणी तो असा की तुम्हाला आत्मपरीक्षण करायला ट्रेन हे उत्तम ठिकाण आहे निदान मला तरी तसं नेहमी वाटत आलय. जर आपण एकटे असू तर कधी कधी असाही वाटून जातं की उगाच अनोळखी लोकांच्या तोंडाकडे बघत बसण्यापेक्षा शांतपणे विचार करता येतो. तुम्ही जर
होतकरू कवी-लेखक असाल तर हे कल्पना सुचण्याच्या दृष्टीने महत्वाचं असतं आणि वेळ मिळेल तेव्हा ती कल्पना केवळ कागदावर उमटवणं सोपं जातं. मी अनेक मोठ्या कवी-लेखकांचे असे किस्से ऐकलेले आहेत की त्यांना प्रवासात कल्पना स्फुरतात आणि थोडंफार माझ्याही स्वानुभावावरून!
       खरं सांगू हा लेख जो मी आत्ता लिहितोय त्याचे विचार मी ६-७ महिन्यां पूर्वी चंडीगढ ला जातानाच्या ट्रेन च्या प्रवासात सुरु झालेले होते. खूप दिवस हा कच्चा मजकूर डोक्यात रुंजी घालत होता आणि आज सकाळी ट्रेन मधेच एकटा बसलेलो असताना अचानक त्यातील मुद्द्यांची जुळवा जुळाव सुरु झाली होती आणि आत्ता रात्री दोन वाजता मी ह्या लेखाचं शेवटचं वाक्य लिहितोय!
    आता railway ची सगळ्यात important गोष्ट सांगतो.  Superman -spiderman वगरे आपण म्हणतो पण खरे  superheroes  आपल्या रेल्वेचे मोटरमन आहेत. त्यांचं concentration एका क्षणासाठी जरी lose झालं तरी आपले काय हाल होईल  ह्याची फक्त कल्पनाच केलेली बरी! ( पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा! असं माडगुळकर म्हणले ते खरं आहे!!) कळत-नकळत मी सुद्धा त्यांना त्रासिकपणे शिव्या दिल्याच असतील !त्यांची मनोमन माफी मागून आता थांबतो !

                                                    -ओंकार करंदीकर