Friday, April 4, 2014

मी पाहिलेली नांदी !!!! - -ओंकार प्र. करंदीकर .

        मी पाहिलेली नांदी !!!! 
                        --ओंकार प्र. करंदीकर .   
 
नाट्यगृह :आचार्य अत्रे ,कल्याण . 
तारीख :२२ मार्च ,२०१४ . 
वेळ :रात्री ८.३०


     खूप दिवसांनी आज नाट्यगृहात जाऊन नाटक पाहण्याचा अनुभव घेतला. ते नाटक म्हणजे हृषिकेश जोशी लिखित आणि दिग्दर्शित 'नांदी'. नुकताच या नाटकाचा ५०वा प्रयोग झाला होता. खूपच उत्सुकता होती,  कारण मराठी सिनेमा आणि नाट्य सृष्टीमधले १० आघाडीचे कलाकार एकाच वेळी रंगमंचावर पाहण्याचं भाग्य लाभणार होतं . 
    नाटक सुरु होण्याअगोदर आपलं राष्ट्रगीत लावलं गेलं. अभिमानाने छाती फुलून आली. त्यामुळे सुरवात सुंदर झाली. हजारो वर्षांपासूनची जुनी नाटकं ते आताची modern plays आणि मधल्या काळातली आपली संगीत नाटकं यांची एकत्र गुंफण करण्याचं अप्रतिम काम हृषिकेश जोशी यांनी केलंय. 
   नाट्यशास्त्राचे आद्य जनक 'भरत मुनी ' यांचा TV वर Exclusive Interview ही concept मुळात खूप refreshing आहे आणि त्यात सुद्धा त्या interviewer च्या भूमिकेत माझी आवडती अभिनेत्री स्पृहा जोशी. तिने खूप सुंदर काम केलंय . या interview मधल्या प्रश्नांची उत्तर देताना भरतमुनी त्या त्या काळातल्या नाटकाचं स्वरूप उलगडून दाखवतात. अर्थात मी नाटकाचे पूर्ण detail वर्णन करणार नाहीये. नाहीतर त्यातली मज निघून जाईल. ते रसिकांनी स्वतः जाऊन पाहणचं उत्तम!!!!
    अजय पुरकर यांनी गायलेली 'नभ मेघांनी आक्रमिले ' आणि 'प्रिये पहा ' हि गाणी आजच्या माझ्या सारख्या तरुण मुलांना सुद्धा नाट्य संगीताच्या प्रेमात पाडतात.      
    या नाटकाला स्वतः हृषिकेश जोशी ,शरद पोंक्षे ,अविनाश नारकर ,प्रसाद ओक ,चिन्मय मांडलेकर ,अजय पुरकर ,स्पृहा जोशी,तेजस्विनी पंडित ,अश्विनी एकबोटे,सीमा देशमुख असे एक से बढकर एक अभिनेते-अभिनेत्री लाभले आहेत . या सगळ्यांनी इतकी बेमालुमपाने आपली पात्रं रंगवली आहेत न त्याला तोड नाही खरच. 
   पुन्हा एकदा धन्यवाद !!! Really  Hats Off  !!! मी आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वोत्तम नाटक होतं . 
               
                          -ओंकार प्र. करंदीकर .                

2 comments: