Tuesday, August 5, 2014

पुन्हा एकदा भेटलेला 'बोक्या सातबंडे' … ओंकार करंदीकर.

           पुन्हा एकदा भेटलेला 'बोक्या सातबंडे' … 

            मागच्या आठवड्यात मावशीकडे गेलो होतो ,तेव्हा सहज कंटाळ घालवायला म्हणून माझ्या मावसभावाचा कॉम्पुटर लावला आणि त्यातल्या movies चा folder उघडून जरा mood फ्रेश करेल असा सिनेमा हुडकत होतो,लिस्ट मधल्या एका नावावर नजर स्थिरावली -'बोक्या सातबंडे' . खरं  सांगतो माझ्या लहानपणच्या या पुस्तकांतून भेटलेल्या सवंगड्याच्या जीवनावर पुढे कधी एक सिनेमा बनवला जाईल असं कधी वाटलचं नव्हतं. 
            श्री.'दिलीप प्रभावळकर' यांच्या लेखणीतून निर्माण झालेलं हे काल्पनिक पात्र पुन्हा एकदा खूप वर्षांनी मी बघत होतो आणि या वेळी मला imagination करावं लागत नव्हतं कारण ते पात्र प्रत्येक्ष स्क्रीन वर नाचत होतं.हा सिनेमा मला खूप आवडला याचं कारण १०-१२ वर्षांपूर्वी बोक्याची पुस्तकं वाचताना डोळ्यासमोर कल्पनेनी उभी केलेली ही सगळी पात्रं -स्वतः बोक्या,विजू दादा, बोक्याचे आई-वडील,आजी, त्याचे मित्रं आणि ह्या सिनेमातली पात्रं ही एकमेकांशी तंतोतंत जुळणारी वाटली मला. 
             अर्थात या सिनेमासाठी थोडा वेगळा Screenplay असणं साहजिक आहे. मी हा चित्रपट एखाद्या लहान मुलासारखा खुर्चीला खिळून राहून पाहिला आणि त्यातले बोक्याच्या चलाखपणाचे,त्याला बालवयातसुद्धा समजलेल्या माणुसकीचे,निरागसपणे इतरांना मदत करण्याचे प्रसंग एकामागून एक पाहत होतो आणि जेव्हा चित्रपट संपला तेव्हा मला जाणिव झाली की आपले डोळे नकळत पाणावलेले आहेत. 
              नाही! मी एवढ्याश्या तेवढ्याश्या कारणांनी हळवा होणारा माणूस नाही …. मग विचार केला हे डोळ्यात दाटलेलं पाणी किमर्थम? उत्तर मिळालं ना …. ते असं की बोक्याच्या रुपात कित्येक वर्षांनी हरवलेलं निरागस बालपण मला पुन्हा गवसलं होतं आणि त्यामुळे मिळालेलं satisfaction डोळ्यांत दाटलेल्या पाण्यातून प्रतीत होत होतं.हळूहळू नजर शून्यात स्थिरावली आणि एकामागून एक लहानपणचे पुस्तकांमधून भेटणारे सर्व सवंगडी -फास्टर फेणे,शेर्लोक होम्स आणि TV मधून भेटणारे Pokemons,Beyblades,Tom & Jerry, Swat Cats भोवती पिंगा घालू लागले;काही क्षणांसाठी का होईना मी  पुन्हा त्या निरागस विश्वात मश्गुल झालो. तिथे आत्ताचे झोप उडवणारे आणि सतत उत्तरं   मागणारे प्रश्न नव्हते. 
              पण आदल्याच  दिवशी लागलेल्या engineeing result ची चौकशी करणारा … खरंतरं कान उखाडणी करणारा आमच्या मातोश्रींचा call आला आणि माझी समाधी भंग पावली. मी यावेळी आईवर न चिडता (नेहमीप्रमाणे) शांतपणे सगळं ऐकून घेतलं (कदाचित बोक्याचा परिणाम असेल) अर्थात काही बिनबुडाची वाटणारी कारणं ही दिलीच … बचावाप्रित्यर्थ ! तर मुद्दा असा की मी वास्तवात परतलो आणि आठवलं की आता माझा पुस्तकांचा आणि सिनेमांचा choice बाळबोध नाहीये,आता pokemon ची जागा football ने आणि 'फास्टर फेणे' ची जागा 'चेतन भगत' च्या novels नी घेतली आहे. 
             पण त्याच वेळी एक गोष्ट मनात ठरवून टाकली की ह्यापुढे काही होउदे ! खूप वर्षांनी मला माझ्यातलं गवसलेलं हे लहान मूल जपायचं! आणि नकळत तोंडी 'क्यूंकी तुम ही हो' हे न येता 'असावा सुंदर चोकलेट चा बंगला' हे मी गुणगुणू लागलो आणि माझचं मला हसू आलं ,भावाने विचारलं का हसतोयस? तर काहीनाही एक Non-Veg जोक SMS  वर वाचला म्हणून हसतोय अशी थाप मारली आणि बाजूला झालो! … 
                                      -ओंकार करंदीकर.