Tuesday, April 29, 2014

मला भावलेले 'पु.ल.' - ओंकार करंदीकर

  मला भावलेले  'पु.ल.'  - ओंकार करंदीकर


Article on Pu.La. Deshpande by Onkar Karandikar

                                                     
           मी साधारण ५-६ वी मध्ये असेन, तेव्हा माझ्या हातात एक निबंध-लेखनाचं (इयत्ता १० वी च्या मुलांचं ) पुस्तक आलं.सहज वाचताना मला त्यात एक 'माझा आवडता लेखक' असा निबंध सापडला. त्यात एक ओळ होती 'विनोदाला कारुण्याची झालर असणारा लेखक' ,ती ओळ होती उभ्या महाराष्ट्राच्या हृदय-सिंहासनावर राज्य करणारे विनोदसम्राट,साहित्यिक,गीत-संगीतकार,नाटककार,नट … विशेषणं कमी पडतील असे  'पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे' यांच्याविषयी. तेव्हा मला त्याचा फारसा अर्थ कळला नव्हता ,पण ती ओळ मात्र माझ्या चांगलीच लक्षात राहिली.
           त्या नंतर काही वर्षांनी हळुहळू जेंव्हा पु.लं नी लिहिलेली 'व्यक्ती आणि वल्ली', 'गणगोत' यांसारखी पुस्तकं  वाचली, 'असा मी असामी' वाचलं , तेंव्हा ती ओळ मला पुन्हा आठवली आणि त्याचा अर्थ उलगडू लागला.खरतर मी  पु.लं .च सगळ्या प्रकारचं  साहित्य वाचलेलं नाही . (ही खरतर माझी घोडचूक आहे )पण जे काही वाचलं त्यावर मनापासून प्रेम केलं. मला नेहमी खंत वाटते की मला कळत्या वयात पु.लं. ना बघता-ऐकता आलं नाही.मला त्यांच्या भाषणांच्या आणि व्यक्तिचित्रांच्या ध्वनिफिती ऐकताना,पुस्तक वाचताना नेहमी असं वाटतं की अरे या माणसाची निरीक्षण शक्ती आणि कल्पना शक्ती किती जबरदस्त असली पाहिजे,कारण समाजात दिसणारे नमुने (त्यात मीही आलोच ) आणि त्याला कल्पनाशक्तीची जोड देऊन त्यांनी उभी केलेली पात्रं (आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला गोवून )ही इतकी अप्रतिम आणि जिवंत वाटतात की सारखं आपल्याला वाटतं राहतं की आपणही त्या लोकांना पु.लं. सोबत भेटलोय की काय!!!
            रत्नागिरीतला कडवट वाणीचा पण आतून प्रेमळ असणारा 'अंतू बरवा' ,तोंडावर शिव्या देणारे पण मित्रांसाठी काय वाट्टेल ते करायला तयार असणारे ,संगीत-नाटकाच्या उद्धारासाठी खपणारे दिलदार 'रावसाहेब',शिवाजी महाराज-रामदास स्वामी ही मंडळी आपल्या पंक्तीला जेवत असल्याच्या थाटात त्यांच्या ,गोष्टी सांगणारे 'हरितात्या' ,कधीही पुस्तकानुरूप(नुसतं पुस्तकी ) न शिकवता विद्यार्थ्यांच्या तळमळीने- आपुलकीने शिकवणारे 'चितळे मास्तर ',लग्न समारंभात स्वयं-सेवाकासारखी धावाधाव करणारा अष्टपैलू 'नारायण', पुस्तकांशी वेड्यासारखा एकनिष्ठ झालेला 'सखाराम गटणे', रेल्वे प्रवासात जगण्यातली गम्मत सांगून जाणारे 'पेस्तन काका '(१०० % ), एकसुद्धा पुस्तक न वाचता बिनधास्त त्यावर परीक्षणं लिहिणारा टीकाकार 'लखू रिसबूड', संस्थाही स्थापन होण्याआधी त्यांचं सेक्रेटरी पद हाती घेणारा' बापू काणे'. .   .
            ही  सगळी  मंडळी एक बढकर एक विनोदी पण त्यात नुसता विनोद नसतो , कारण पु.लं च्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही मनुष्याला फक्त एकच बाजू कधीच नसते ,त्याची एक दुसरी आपल्याला माहित नसलेली दुखरी बाजूही असतेच असते आणि  हीच ती पु.लं. च्या विनोदाला लाभलेली 'कारुण्याची झालर' . जी आपल्या मनाचा ठाव घेते. पु.लंं. ना नुसताच हशा-धमाल करायची नसते ,त्यांना प्रत्येक वेळी त्यातून काही तरी सांगायचं असतं. या सगळ्या पात्रांमध्ये असलेला एक दुखरा कोपरा ,त्या द्वारे ते आपल्या काळजाला हात घालतात  आणि अचानक पोट धरून हसत असताना आपले डोळे पाणावतात …या पेक्षा सामार्थ्याशाली दुसरं काही असूच शकत नाही !! हेच खरं यश आहे.
            त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेला अजून एक अविष्कार म्हणजे 'बटाट्याची चाळ' आणि वाऱ्यावरची वरात'. शिवाय  'असा मी असामी' ,'काही नवे ग्रहयोग','मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर', 'मी आणि माझा शत्रू पक्ष' ,'माझे पौष्टिक जीवन',ते चौकोनी कुटुंब' , म्हैस,पानवाला, बिगरी ते matric , यांसारखे चौफेर,हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे लेख आणि मग त्यांचंच खुमासदार पद्धतीने केलेलं वाचन या मधून पु.ल. त्यांच्या सगळ्या पात्रांशी पूर्णपणे एकरूप होऊन जातात पण त्याचवेळी त्यांनी त्यात केलेली त्या त्या काळातील दाखल्यांची गुंफण हे केवळ अद्वितीय आहे.
                त्यांनी जवळ जवळ ५०-६० वर्षांपूर्वी लिहिलेली हि व्यक्तिचित्र आजही तितकीच ताजी आणि हवीहवीशी वाटतात की माझ्यासारख्या कॉम्पुटर-स्मार्टफोन च्या जमान्यातल्या एका तरुण मुलाचा mobile पु.लं.च्या audio clips नी अभिमानाने भरावा इतकं कालातीत लिखाण त्यांनी केलय. 'अपूर्वाई' आणि 'पूर्वरंग' ही प्रवास वर्णनात्मक पुस्तकं कोणालाही आपल्या बुकशेल्फ वर असावीत अशी आहेत.शिवय त्यांनी कित्येक नाटकं लिहिली आहेत. त्या पैकी 'ती फुलराणी' हे नाटक मी पाहिलंय. अविनाश नारकर आणि अमृता सुभाष यांचा अप्रतिम अभिनय त्यात आहे .  
                खरतर मी पु.लं. बद्दल लिहिणं  म्हणजे 'काजव्याने सुर्याविषयी बोलण्यासारखं आहे '(अर्थात सखाराम गटणेचे हे शब्द मला म्हणावेसे वाटले तर त्यात नवल नाही ). पण पु.लं. विषयी वाटणारा आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी इतकं तरी लिहिण्याचं धाडस मी केलं. आज पु.लं आपल्यात नाहीत पण त्यांनी अजरामर केलेली ही सगळी पात्रं आपली नेहमीच सोबत करतील आणि सतत त्यांची आठवण करून देतील यात तिळमात्रही शंका नाही.
               असो या महाकाय-चतुरस्त्र माणसाविषयी कितीही लिहिलं तरी कमीच!! त्यामुळे आता थांबलेलंच बरं आणि त्यांनी लिहून ठेवलेलं वाचायला वाचायला प्रारंभ करणं हे अधिक उत्तम.
                                                                                   -ओंकार करंदीकर. 
                                                                                                 
                                           
                                                 

Sunday, April 13, 2014

एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!!!!! - -ओंकार करंदीकर


                 

                                                                 एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!!!!!

                                         (मी आत्तापर्यंत पाहिलेली सर्वोत्कृष्ट मालिका)


                       साधारण पणे 'टीवी सिरिअल्स ' ह्या चालू समाजाचं प्रतिबिंब दाखवतात असं आपण मानतो पण   काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मालिका सोडल्या (उदा .झी मराठी वरच्या  श्रीयुत गंगाधर टिपरे , एका लग्नाची दुसरी गोष्ट , एका लग्नाची तिसरी गोष्ट ) तर बाकी सगळीकडे नुसता द्वेष ,मत्सर ,एकमेकांचा सूड घेणं ,आप्तांच्याच आयुष्यात मोडते घालणं हे खूप वाढलंय , म्हणजे थोडसं कथानकासाठी दाखवणं वेगळं आणि त्यातच गुरफटून जाऊन मूळ मुद्दा बाजूला टाकणं हेच जास्त झालंय आणि हे योग्य नाही ,खऱ्या सामाजिक जीवनात सुद्धा नसेल इतकं किळस आणणारं ,क्रूर दाखवून लोकांच्या मनात नसलेली पापं ह्या मुळे भरवून दिली जातात असा मला वाटतं. आपणच हे थांबवू शकतो ,जर आपण असा काही बघायचं नाही असा दृष्टीकोन ठेवला तर अपोआप हि लोकं आत्मपरीक्षण करतील आणि चांगलंच द्यायचा प्रयन्त करतील. 


                  
                त्याच बरोबर हे मान्य करायला हवं की ' एका लग्नाची तिसरी गोष्ट ' सारख्या खूप उच्च मुल्य जपणाऱ्या ही काही मालिका आहेत ,खरच त्यातला  प्रत्येक भाग काहीतरी शिकवून जातो ,विचार करायला लावतो ,अंतर्मुख करून टाकतो आणि म्हणून त्या मालिकेवर सगळे खूप प्रेम करतात.  त्यातले सगळे लोक आपलेच होऊन जातात . हेच खरं यश आहे . त्यांचं अभिनंदन झालंच पाहिजे.
                 स्वप्नील -मुक्ता च्या 'एका लग्नाची दुसरी गोष्ट ' ह्या अत्यंत उत्कृष्ट आणि लोकांच्या मनात घर केलेल्या मालिके नंतर उमेश-स्पृहा च्या 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' कडून माझी आणि सगळ्यांचीच खूप expectations होती and I must say its not only completing it but surpassing all limits. 
                 स्वतः उमेश कामत ,स्पृहा जोशी हे तर आता माझ्या आणि सगळ्या अबाल-वृद्धांच्या गळ्यातले ताईत झाले  आहेतच ,पण इतरही सगळे (मी नावं लिहिणार नाही, कारण चुकून एखाद्या कलाकाराचं नाव माझ्या हातून राहायला नको … कारण मला सगळेच आवडतात,सगळे आपलं काम चोख बजावतात )अत्यंत उत्कृष्ट कलाकार या मालिकेला लाभले आहेत.उमेश-स्पृहा यांनी साकारलेली ओम-ईशा तर इतकी मनाला भावतात कारण ते दोघही त्या भूमिकेशी एकरूप होऊन गेले आहेत.त्या भूमिका ते स्वतः जगत आहेत असं वाटतं. त्यांचे संवाद,expressions आणि मुख्य म्हणजे डोळ्यातले भाव खूपच अप्रतिम. त्याचसोबत ओमच्या घरचे सगळे म्हणजे काके,दत्ताभाऊ,कामत आजोबा ,प्रमिला आजी ,जयेश ,धना ,मधु,शोभना मावशी आणि सुशांत सुद्धा इतके सुंदर की ते आपल्या घरातलेच वाटतात. ईशाच्या घरचे मोठे बाबा, आई-उमा काकू ,छोटी पिंकी-तिचा खोडकर भाऊ,अदिती आणि इतर सगळेच एक एक पात्र खूप मस्त रंगवलय. ईशाची best  friend आशु,ओमचा मित्र हे पण भारीच.  प्रधान सर-ब्रम्हे सर तर अफलातून झाले आहेत.Greenroof मधला विरू अप्रतिम . आता तुषार सर आणि शिल्पा ताई ची एन्ट्री झाल्यावर ओम चे खरे आई बाबा पण अप्रतिम साकारले आहेत. खरच hats off to detailing of characters. 
                 त्यांच्या जोडीला तितक्याच ताकदीने विनोद लवेकर यांचं दिग्दर्शन,संदेश कुलकर्णी यांचा पटकथा लेखन ,सागर देशमुख यांचे संवाद  सगळीच भट्टी अफलातून जमली आहे. प्रत्येक episode हे लोक एकत्र येउन  सुंदर बनवून टाकतात. त्याला जोड आहे amazing background music ची. 
                 या मालिकेचं शीर्षक गीत 'प्रेमात रंगल्या प्रेमाच्या आभाळी ….' हे तर माझ्या आणि अनेकांच्या mobile ची ringtone झालंय. संदीप खरे यांचे अप्रतिम हळुवार शब्द आणि सलील कुलकर्णी यांचं संगीत या गाण्याला लाभला आहे. हे गाणं एक वेगळीच positive ऊर्जा देऊन जातं. प्रेमाची ताकद किती मोठी असते हे सांगणार हे गीत खूप सुंदररित्या मालिकेला चपखल बसलं  आहे. 
                तर अश्या प्रकारे कुठलीही फालतू मसाला न भरता ही  मालिका एक आदर्श निर्माण करत आहे. आई-वडील,बहिण-भाऊ,आजी-आजोबा,काका-काकू या सगळ्या नात्यांची एक नवीन ओळख होते आहे आणि त्याच बरोबर रक्ताच्या नात्यांबरोबरच प्रेमाची-मैत्रीची नाती कशी जोडता येतात याचा मूर्तिमंत रूप म्हणजे 'एका लग्नाची तिसरी गोष्ट'.
                  आता कितीही लिहिलं तरी ते कमीच पडेल कारण या मालिकेवर माझं  प्रचंड प्रेम आहे.असंच ही मालिका आम्हाला हसवत -रडवत राहो!!! आपल्याला जरी वाटत असलं की हे कधीच संपू नये पण शेवटी back to reality …it will end after few months because thats the way it should be .कलाकारांना नवीन आव्हानं आवडतात. Its our good fortune that we can interact with Umesh-Spruha   on twitter and share our thoughts with them,also many friends are found because of ELTG .
                     Thanks to entire team of ELTG for giving so much pleasure that we watch it multiple times and on youtube also :) Thanks for everything :) Hats off ELTG !! 
                              -ओंकार करंदीकर




Friday, April 4, 2014

मी पाहिलेली नांदी !!!! - -ओंकार प्र. करंदीकर .

        मी पाहिलेली नांदी !!!! 
                        --ओंकार प्र. करंदीकर .   
 
नाट्यगृह :आचार्य अत्रे ,कल्याण . 
तारीख :२२ मार्च ,२०१४ . 
वेळ :रात्री ८.३०


     खूप दिवसांनी आज नाट्यगृहात जाऊन नाटक पाहण्याचा अनुभव घेतला. ते नाटक म्हणजे हृषिकेश जोशी लिखित आणि दिग्दर्शित 'नांदी'. नुकताच या नाटकाचा ५०वा प्रयोग झाला होता. खूपच उत्सुकता होती,  कारण मराठी सिनेमा आणि नाट्य सृष्टीमधले १० आघाडीचे कलाकार एकाच वेळी रंगमंचावर पाहण्याचं भाग्य लाभणार होतं . 
    नाटक सुरु होण्याअगोदर आपलं राष्ट्रगीत लावलं गेलं. अभिमानाने छाती फुलून आली. त्यामुळे सुरवात सुंदर झाली. हजारो वर्षांपासूनची जुनी नाटकं ते आताची modern plays आणि मधल्या काळातली आपली संगीत नाटकं यांची एकत्र गुंफण करण्याचं अप्रतिम काम हृषिकेश जोशी यांनी केलंय. 
   नाट्यशास्त्राचे आद्य जनक 'भरत मुनी ' यांचा TV वर Exclusive Interview ही concept मुळात खूप refreshing आहे आणि त्यात सुद्धा त्या interviewer च्या भूमिकेत माझी आवडती अभिनेत्री स्पृहा जोशी. तिने खूप सुंदर काम केलंय . या interview मधल्या प्रश्नांची उत्तर देताना भरतमुनी त्या त्या काळातल्या नाटकाचं स्वरूप उलगडून दाखवतात. अर्थात मी नाटकाचे पूर्ण detail वर्णन करणार नाहीये. नाहीतर त्यातली मज निघून जाईल. ते रसिकांनी स्वतः जाऊन पाहणचं उत्तम!!!!
    अजय पुरकर यांनी गायलेली 'नभ मेघांनी आक्रमिले ' आणि 'प्रिये पहा ' हि गाणी आजच्या माझ्या सारख्या तरुण मुलांना सुद्धा नाट्य संगीताच्या प्रेमात पाडतात.      
    या नाटकाला स्वतः हृषिकेश जोशी ,शरद पोंक्षे ,अविनाश नारकर ,प्रसाद ओक ,चिन्मय मांडलेकर ,अजय पुरकर ,स्पृहा जोशी,तेजस्विनी पंडित ,अश्विनी एकबोटे,सीमा देशमुख असे एक से बढकर एक अभिनेते-अभिनेत्री लाभले आहेत . या सगळ्यांनी इतकी बेमालुमपाने आपली पात्रं रंगवली आहेत न त्याला तोड नाही खरच. 
   पुन्हा एकदा धन्यवाद !!! Really  Hats Off  !!! मी आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वोत्तम नाटक होतं . 
               
                          -ओंकार प्र. करंदीकर .